मुंबई – राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने आता SIT अर्थात विशेष तपासणी समिती नेमली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन केले जाते की नाही याची झाडाझडती ही समिती धर्मादाय रुग्णालयांवर ‘नजर’ ठेवण्याचे काम करणार आहे.
राज्यातील सर्व धर्मदाय रुग्णालयात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Pune तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारने ही विशेष तपासणी समिती नेमून मोठे पाऊल उचलले आहे. धर्मादाय रुग्णालयांच्या झाडाझडतीसाठी विशेष तपासणी समिती नेमली आहे. तसेच एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे. या विशेष समितीमध्ये तीन विभागाच्या सदस्यांचा समावेश असणार आहे. त्यांना निर्धन रुग्ण निधी खात्याच्या तपासणीचेही अधिकार दिले आहेत.
धर्मदाय रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळण्यासाठी महत्त्वाचा हा निर्णय घेतला आहे. समितीमध्ये धर्मादाय आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि धर्मादाय रुग्णालय helping center सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. धर्मादाय म्हणजे एक असे रुग्णालय जे समाजसेवेच्या उद्देशाने चालवले जाते. या रुग्णालयांना चालवण्यासाठी आवश्यक असलेला निधी हा दानधर्मातून किंवा इतर सामाजिक संस्थांकडून मिळतो. या रुग्णालयांचे मुख्य उद्दिष्ट्य हे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना मोफत किंवा कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे हे असते. या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत किंवा कमी दरात उपचार उपलब्ध करुन दिले जातात. राज्यात 464 धर्मादाय रुग्णालये आहेत. त्यापैकी 80 रुग्णालये ही एकट्या मुंबई शहरात आहेत.