हर्षल पाटील उपकंत्राटदार होता !सरकारचे धक्कादायक विधान

Harshal Patil Was a Subcontractor! Shocking Statement from the Government

Harshal Patil Was a Subcontractor! Shocking Statement from the Government


सांगली – वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे रहिवासी तरूण ठेकेदार हर्षल पाटील(Harshal Patil suicide)
यांनी सरकार थकबाकीचे पैसे देत नाही म्हणून नैराश्येपोटी(Contractor suicide Maharashtra) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांपाठोपाठ आता ठेकेदारांवरही आत्महत्या करण्याची नामुष्की ओढवली आहे की काय अशी शंका काहींनी व्यक्त केली.(Jal Jeevan Mission )
हर्षल पाटील यांनी सरकारच्या जल जीवन मिशन या योजनेतून गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे १ कोटी ४० चे बिल त्यांनी सरकारला दिले होते. मात्र वारंवार तगादा लावूनही एक वर्षापासून सरकारकडून पैसे मिळत नाहीत हे पाहून पाटील निराश झाले होते. या एक कोटी ४० लाख रुपयांच्या बळावर त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून ६५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा भार असह्य झाल्याने पाटील यांनी आपले आयुष्य संपवले.
पाटील यांच्या आत्महत्येवरून विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले असताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य करीत म्हटले की सर्व तपास केल्यावर लक्षात आले आहे की त्याचे सरकारकडे कोणतेही बिल नव्हते . त्याला सरकारने कोणतेही कंत्राट दिले नव्हते . तो कदाचित उपकंत्राटदार असावा .(Ajit Pawar faction reaction)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली नाही.तर सरकारने त्यांचा खून केला आहे,असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.(Subcontractor Harshal Patil news)
ठेकेदार पाटील यांनी प्रामाणिकपणे जलन जीवनचे काम पूर्ण केले. पण वर्ष उलटून गेले तरी सरकारने त्यांचे १ कोटी ४० लाखाचे बिल दिले नाही. कारण सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. लाडकी बहिण सारख्या लोकप्रिय योजनेमुळे राज्याचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडून गेले. त्यामुळेच राज्यात आता शेतकऱ्यांपाठोपाठ सरकारी ठेकेदारही आत्महत्या करू लागले आहेत ,असे म्हणत ठेकेदारांची बिले द्यायला पैसे नाहीत तर कामे काढता कशाला असा सवाल राऊत यांनी विचारला.

पुढचा नंबर माझा असेल
पोस्टची जोरदार चर्चा

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Twitter post)यांनी ठेकेदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबद्दल एक्स पोस्ट करून सरकारचे या घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या लोकप्रिय योजनांमागील असंवेदनशील वास्तव, हर्षल पाटील –वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या अशा शीर्षकासह आव्हाड यांनी पोस्ट लिहिली आहे.त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, हर्षल पाटील एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार. त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण केली. काम झाले, बिले दिली. पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाही.
महत्वाची बाब म्हणजे आव्हाड यांची ही पोस्ट एक्स सोशल मीडिया प्लॅटफॅर्मवर झळकल्यानंतर सुमारे तासाभराने एकाने त्यांना टॅग करत हर्षल पाटिल यांच्या नंतर बहुधा माझा नंबर असेल, अशी पोस्ट केली. ती पोस्ट पाहून आव्हाडही चरकले. त्यांनी ती पोस्ट मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून ही गोष्ट गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.