मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम (heavy rainfall continues) असून आज गडचिरोली, गोदिया, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, धारशिव, बीड, कोल्हापूर, पालघर या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. पुणे, सातारा, अमरावती, पालघर या जिल्ह्यांना उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
गडचिरोली (Gadchiroli)जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिरोंचा–जगदलपूर राष्ट्रीय महामार्गासह (Sironcha–Jagdalpur National Highway)अहेरी–वटरा व कढोली–उराडी मार्ग बंद आहेत. पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी साचल्याने १०० हून (100 villages)अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दहा–बारा दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक करपण्याची भीती होती. मात्र, तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांना संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, गोसेखुर्द धरणाच्या (Gosekhurd dam)उजव्या कालव्यात बुडून सत्यपाल सलामे (२६) या युवकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील सात मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात काही तालुक्यांत जोरदार तर घाटाखालील भागात रिमझिम पाऊस झाला. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान (damage) झाले.
बीड (Beed)जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर दोन दिवसांपासून पावसाची हजेरी असून खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. बिंदुसरा धरण (Bindusara dam)दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. धाराशिवमध्येही दिवसभर संततधार सुरू होती. सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूरमध्ये (Kolhapur)राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धामणी धरणाचेही तीन दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आले.
रायगड (Raigad)जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात रात्री जोरदार पावसामुळे नदीची पातळी वाढली आहे. पालघर जिल्ह्यात संततधार कायम असून सूर्या, वैतरणा आणि पिंजाळ नद्यांना पूर आला आहे.