देशाच्या उत्तरेत जोरदार पाऊस अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती

Heavy rainfall in northern India, flood situation in several states

Heavy rainfall in northern India, flood situation in several states

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत(Northern India heavy rainfall) असून अनेक भागांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांच्या डोंगराळ भागात स्थिती अधिकच दारुण झाली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सह अनेक राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.(India flood situation 2025)
उत्तर प्रदेशातील सहारनपूर, शामली, बरेली, पिलभीत, याबरोबरच उत्तराखंडमधील १६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात ढगफुटी, पावसामुळे अनेक मार्ग बंद पडले आहे. चंबा, मंडी व कागंडा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे २४३ रस्ते बंद झाले तर वीज व पाणीपुरवठाही बाधित झाला. उत्तराखंडमध्ये(Uttarakhand) रुद्रप्रयाग, अलकनंदा या भागात जोरदार पाऊस झाला. टनकपूर तवाघाट लिपुलेख हा मार्ग बंद झाला आहे. यमुनोत्री महामार्गही गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. तर उत्तरकाशी, टिहरी, बागेश्वर, डेहराडून व रुद्रप्रयाग या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य प्रदेशातही दमोह, डिंडोरी, जबलपूर, कटनी, मंडला, पन्ना, सागर, सिवनी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जबलपूरच्या बरगी धरणाचे ९ दरवाजे उघडल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहडोल रेल्वे स्थानकावर फलाटापर्यंत पाणी आल्याने रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. कटनी मध्ये सर्व नद्या नाल्यांना पूर आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. कटरामध्ये शनिवारी रात्र हिमकोटी मार्गावर दगड आल्याने माता वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर सेवाही बाधित आहे. राजस्थानमधील २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. सीकर, जयपूर, चुरुसह उदयपूर व कोटा मध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील काही दिवसांमध्ये मधेपूर, सहरसा, पूर्णिया, नालंदा, गया, पाटणा, जहानाबाद, अरवल, रोहतास भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. छत्तीसगड, ओडिशा, छत्तीसगड, बंगाल, सिक्किम मध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.