नागपूरमध्ये हिट अ‍ॅण्ड रन दोघांचा मृत्यू! २ जखमी

Hit-and-run in Nagpur: Two dead, 2 injured

Hit-and-run in Nagpur Two dead, 2 injured

नागपूर – नागपूरमधील nagpur कोंढाळी तालुक्यातील काटोल मार्गावरील चक्री घाटात काल hit and run हिट अ‍ॅण्ड रनची घटना घडली. एका ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. मंगेश शंकर खाडे (३७) आणि पवन सुनील सेंबेकर (२३) अशी मृतांची नावे आहेत. आकाश वासुदेव जवणे (३२) आणि गौतम श्रावण बागडे (२४) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मंगेश आणि पवन हे दोघे अमरावतीतील पोरगव्हाण येथील रहिवासी होते. तर आकाश आणि गौतम हे दोघे नरखेड तालुक्यातील जलालखेडा गावातील आहेत. चक्री घाटातील वळणावर ट्रकचालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या त्यांच्या दुचाकींना धडक दिली. या धडकेत पहिल्या दुचाकीवरील मंगेश आणि पवन जागीच मृत्युमुखी पडले. तर दुसऱ्या दुचाकीवरील आकाश आणि गौतम यात गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कोंढाळी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केल. पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सध्या त्याचा शोध सुरू आहे.