Home / News / शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Husband and Wife Die After Surgery ! Allegations of Medical Negligence Against Doctors

Husband and Wife Die After Surgery ! Allegations of Medical Negligence Against Doctors

पुणे –पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Sahyadri Hospital)करण्यात आलेल्या लिव्हर ट्रान्सप्लांट (Liver Transplant Death Pune)शस्त्रक्रियेनंतर दांपत्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (Surgery Negligence)बापू बाळकृष्ण कोमकर यांना त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांनी लिव्हर दान केले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत बापू यांचे निधन झाले, तर आठ दिवसांनी कामिनी यांचाही मृत्यू झाला.

मागील आठवड्यात बुधवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शुक्रवारी म्हणजे दोन दिवसांतच बापू कोमकर यांचा मृत्यू झाला, तर शनिवारी कामिनी कोमकर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कोमकर यांच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर आणि सह्याद्री हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कोमकर कुटुंबाने या शस्त्रक्रियेसाठी कर्ज काढून व व्याजाने पैसे उभे केले होते. सुरक्षित शस्त्रक्रियेचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच दोघांचा बळी गेला, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.