IPL 2025 LSG vs PBKS | आयपीएल 2025 (IPL 2025) च्या 13 व्या सामन्यात आज पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants vs Punjab Kings) यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केले होते. तर, लखनऊ संघाला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यानंतर दमदार पुनरागमन करत लखनऊने सनरायझर्स हैदराबादला 5 गडी राखून हरवले. आता दोन्ही संघांचे मनोबल वाढलेले आहे, त्यामुळे आज एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.
पंजाब किंग्ससमोर लखनऊच्या (Lucknow Super Giants) 2 फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल. मिचेल मार्श आणि निकोलस पूरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पूरन या हंगामातील ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर मिचेल मार्श चौथ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, पंजाब किंग्सबद्दल बोलायचं झाल्यास, स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात शशांक सिंहने त्याला उत्तम साथ दिली होती. संघाला ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिससारख्या फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल अद्याप अपेक्षेप्रमाणे छाप पाडू शकलेला नाही.
गोलंदाजांना मिळू शकते मदत
लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच गोलंदाजांना मदत करणारी राहिली आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटू प्रभावी ठरू शकतात. येथे चेंडू अडखळत येतो, त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना अडचणी येतात. त्यामुळे पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहू शकते.
लखनऊच्या मैदानावर दोन्ही संघांची आकडेवारी
लखनऊच्या इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत, तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे दुसरीकडे, पंजाब किंग्सने लखनऊच्या इकाना स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 2 सामने खेळले आहेत, त्यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे, तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी व कुठे खेळला जाईल? (Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Date & Match Venue)
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स (LSG vs PBKS) यांच्यातील सामना आज(1 एप्रिल) अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. सामन्यापूर्वी टॉस सायंकाळी 7:00 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टारवर पाहता येईल.
IPL 2025 साठी दोन्ही संघ
पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह, सूर्यांश शेडगे, मार्को जानसन, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, विजयकुमार विशक, नेहल वढेरा, प्रवीण दुबे, हरप्रीत बराड़, विष्णु विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, हरनूर सिंह, मुशीर खान, पायल अविनाश, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्यूसन, जोश इंग्लिस.
लखनऊ सुपर जायंट्स: एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिगवेश सिंह राठी, प्रिंस यादव, मिचेल मार्श, मणिमारन सिद्धार्थ, हिम्मत सिंह, आकाश महाराज सिंह, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रीट्जके, आर्यन जुयाल, आरएस हैंगरगेकर, युवराज चौधरी, आकाश दीप, मयंक यादव, शमर जोसेफ, अर्शिन कुलकर्णी.