Is RSS a banned organization? CM responds to criticism
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व खासदार सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांनी दिल्लीत राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis) यांनी आज त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रीय स्वयंसेवकसंघ ((RSS))बंदी ही असलेली संघटना आहे का, असा सवाल करत विरोधकांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला याचा अभिमान आहे. संघाने मला समाजातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन देशाचे कल्याण करण्याचे धडे दिले आहेत. मग कोणी संघाच्या कार्यक्रमाला गेले तर इतके अकांडतांडव कशाला करायचे? काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली. ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबत केलेल्या सूचनांचा सरकार गांभीर्याने विचार करेल. भाजपा आमदार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे नाव तीन ठिकाणी मतदारयादीत असल्याचा आरोप केला आहे. यातून खरे मतचोर कोण हे स्पष्ट झाले आहे. याचे उत्तर आता खासदार राहुल गांधींनी द्यावे.