J&K Finance Minister जम्मू-काश्मीरच्या अर्थमंत्र्यांना दिलासा! भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोप नाही

J&K Finance Minister Corruption Case Relief

J&K Finance Minister Corruption Case Relief


मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वांद्रे— कुर्ला संकुलातील(J&K Bank BKC property scam) (बीकेसी) जम्मू आणि काश्मीर बँकेसाठी मालमत्ता खरेदी करण्यात झालेल्या कथित घोटाळ्यात जम्मू आणि काश्मीरचे (J&K Finance Minister)अर्थमंत्री डॉ.हासीब द्राबू यांना (Haseeb Drabu corruption case)न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या प्रकरणी खटला दाखल करणाऱ्या सीबीआयने(CBI court judgment 2025) द्राबू यांचे नाव आरोपपत्रामध्ये समाविष्ट केलेले नसल्याचे सांगितल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने द्राबू यांची गोठवलेली बँक खाती मुक्त करण्याचे आदेश दिले.
११ नोव्हेंबर २०२१ रोजी सीबीआयने आकृती गोल्ड बिल्डर आणि अज्ञात व्यक्तींविरूध्द खटला दाखल केला होता. सीबीआयचा असा दावा आहे की सन २०१० मध्ये जम्मू आणि काश्मीर बँकेने बीकेसीतील मालमत्ता चढया भावाने विकत घेतली. त्यावेळी द्राबू हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्यावर सीबीआयला संशय होता. त्यामुळे सीबीआयने बँकेच्या माहीम शाखेत असलेली खाती गोठवली होती.
मात्र सखोल तपासाअंती सीबीआयला द्राब्रू यांचा या घोटाळ्यामध्ये कसलाही सहभाग आढळून आला नाही. त्यामुळे सीबीआयने आरोपपत्रामध्ये त्यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे न्यायालयाने द्राबू यांची गोठवलेली खाती मुक्त करण्याचे आदेश दिले.