Kamal Haasan takes oath as MP in Tamil
नवी दिल्ली –प्रसिद्ध अभिनेते व राज्यसभा खासदार कमल हसन यांनी आज तमिळमधून राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. (Kamal Haasan Rajya Sabha oath)यावेळी साऱ्या सभागृहाने टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.(Tamil oath MP)
कमल हसन यांची द्रविड मुनेंद्र कळघम (द्रमुक) (DMK support)पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-द्रमुक युतीला पाठिंबा दिला होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही ते सहभागी झाले होते. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले की, मी आज तमिळमध्ये शपथ घेणार असून माझ्या नावासमोर भारतीय अशी नोंद करणार आहे.DMK Rajya Sabha member 2025
कमल हसन यांनी २०१८ मध्ये मक्कल निधी मियाम (Makkal Needhi Maiam)नावाचा पक्ष काढला होता. आधी द्रविडविरोधी असलेल्या या पक्षाने नंतर आपले धोरण काहीसे मवाळ करत द्रमुकला पाठिंबा दिला. राष्ट्रीय हितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. कमल हसन यांनी आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये (Indian actor Kamal Haasan politics)
भूमिका केल्या असून एक प्रयोगशील कलाकार म्हणून ते ओळखले जातात.