Home / News / केसीआर यांच्या कन्या के. कविता बीआरएस पक्षातून निलंबीत

केसीआर यांच्या कन्या के. कविता बीआरएस पक्षातून निलंबीत

KCR’s Daughter K. Kavitha Suspended from BRS

KCR’s Daughter K. Kavitha Suspended from BRS

K. Kavitha Suspended from BRS – भारत राष्ट्र समितीच्या (BRS) विधान परिषदेच्या सदस्या आणि पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao KCR) यांची कन्या के. कविता (K. Kavitha) यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्य आणि पक्षविरोधी कृतींमुळे ही कारवाई केल्याचे पक्षाने निवेदन एक्सपोस्ट करून स्पष्ट केले.


बीआरएसने निवेदनात म्हटले की, एमएलसी के. कविता यांचे अलीकडील वर्तन व पक्षविरोधी गतिविधीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जात आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय के. कविता यांनी नुकत्याच केलेल्या विधानांत पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी सिंचन मंत्री टी. हरिश राव, माजी खासदार संतोष कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी काँग्रेस सरकारशी संगनमत करून केसीआर यांची प्रतिमा मलीन केल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, बीआरएसमध्ये अंतर्गत वाद उफाळले. यापूर्वीही कविता आणि पक्ष नेतृत्वातील संबंध तणावपूर्ण होते. त्यांनी पक्षातील पुरुषप्रधान मानसिकतेवरही टीका केली होती.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन

क्रिस्टल असलेला Motorola चा ‘लक्झरी’ फोल्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; फीचर्स खूपच खास

हवामान विभागाचा अलर्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार,राज्यातील 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट