पुणे- एक मंडळ एक ढोल पथक करा, अशी विनंती पुण्यातील गणेश मंडळांनी पोलिसांना (police) केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूका २९ ते ३० तास (29 to 30 hours) लांबत चाललया आहेत. परंतु हे तास कमी करण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याच्या उद्देशाने आज पुणे पोलिसांची गणेश मंडळांसोबत बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांनी ही विनंती (request) केली.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मंडळांना इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी परवानगी द्यावी, बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सवादरम्यान सुरू करावा, मानाच्या गणपतींची मिरवणूक दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी, असे आवाहन मंडळांनी पोलिसांना केले. याशिवाय टिळक रोडवर सकाळी ८ वाजल्या पासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. टिळक रोड वरून मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांचा निर्णय जवळपास निश्चित असल्याचे मंडळांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पुण्यातील सर्वच गणेश मंडळे मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.