Malegaon Bomb Blast Case ! No decision to seek a pardon
मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon bomb blast case)प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात(Special court verdict Malegaon) उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय अद्याप झाला नाही असे विधी व न्याय विभागाने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.(Malegaon accused acquitted)
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी याविषयी प्रश्न विचारला होता. राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांना कळवले आहे. ३१ जुलै रोजी विशेष तपास पथकाच्या न्यायालयाने २००८ साली मालेगाव (2008 Malegaon blast case)इथे झालेल्या स्फोटाच्या प्रकरणातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर या आरोपींची गावागावात मिरवणूकही काढण्यात आली होती. या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनीही भगवा दहशतवाद नसतो असे म्हणत निकालाबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे शासन खरोखरच या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार की नाही? अशीच शंका उपस्थित होत आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाणारे राज्य सरकार या प्रकरणी का दाद मागत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांनी(Victims’ families review petition) उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.