Manoj Kumar passed away | ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. ते काही दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत होते.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना डीकंपेंसेटेड लिव्हर सिरोसिसचा देखील त्रास होता.
मनोज कुमार (Veteran actor Manoj Kumar) यांनी 3 दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत (Manoj Kumar biography) आपली छाप सोडली. त्यांनी ‘शहीद’ (1965), ‘उपकार’ (1967), ‘पूरब और पश्चिम’ (1970), ‘रोटी कपडा और मकान’ (1974), ‘क्रांती’ (1981) यांसारखे अनेक देशभक्तिपर चित्रपट दिले, ज्यामुळे त्यांना ‘भारत कुमार’ ही उपाधी मिळाली. त्यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते.
1967 मध्ये पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रेरणेतून त्यांनी ‘उपकार’ चित्रपटाची निर्मिती केली. ‘मैदान-ए-जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट अभिनेता म्हणून ठरला. 1999 मध्ये ‘जय हिंद’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने 1992 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2016 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले. तसेच त्यांना 7 फिल्मफेअर पुरस्कार आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या देशभक्तीपर भूमिकांची आठवण कायम जिवंत राहील.