Home / News / सुळेंभोवती मराठा आंदोलकांची गर्दी! गाडीवर बॉटल फेकल्या

सुळेंभोवती मराठा आंदोलकांची गर्दी! गाडीवर बॉटल फेकल्या

Maratha Protesters Surround Supriya Sule’s Car, Bottles Thrown

Maratha Protesters Surround Supriya Sule’s Car, Bottles Thrown

Sule’s Car Attacked at Maratha Protest मराठा समाजाला आरक्षण मिळावे, (Maratha Protesters)या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange-Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला अनेक राजकीय नेते भेटी देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(NCP MP Supriya Sule) आज आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना भेट दिली.

मात्र, सुप्रिया सुळे भेट घेऊन परत जात असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. एक मराठा, लाख मराठा (Ek Maratha, Lakh Maratha)अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. काही आंदोलकांनी शरद पवार(Sharad Pawar) यांच्या विरोधातही घोषणाबाजी केल्याची माहिती आहे. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काही आंदोलकांनी त्यांना वाट करून दिल्याने सुळे आपल्या गाडीत बसल्या. मात्र त्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडीवर बाटल्या फेकल्या. या घटनेमुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला होता. सुदैवाने पोलीस आणि काही आंदोलकांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू

इंडोनेशियातील 700 वर्षे जुनी गणरायाची मूर्ती; ज्वालामुखीपासून करते स्थानिकांचे संरक्षण

जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका