Marathi Actor Tushar Ghadigaonkar dies by suicide
मुंबई – मराठी चित्रपट-मालिका-नाटकातून वेगवेगळ्या भूमिका साकारणारा marathi film industry अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगावकरने Actor Tushar Ghadigaonkar काल राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंब,मित्र परिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. mumbai
तुषार घाडीगावकरची पत्नी काल कामावर गेली होती. ती संध्याकाळी घरी आल्यानंतर तिला तुषारचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला.त्याने दुपारी पंख्याला लटकून गळफास घेतल्याचा अंदाज आहे. तुषार घाडीगावकरने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्यावर भांडूप येथे अंत्यसंस्कार झाले.
तुषार घाडीगावकरचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले . तो भांडूपच्या हनुमान नगर येथे वास्तव्याला होता. त्याने रुपारेल महाविद्यालयातून एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारल्या होत्या. काही वर्षांपूर्वी तो भांडूप सोडून पश्चिम उपनगरातील राममंदिर येथे भाड्याच्या घरात वास्तव्याला होता. त्याठिकाणी तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तर त्याचे आई-वडील भांडूपलाच राहत होते. त्याने छोट्या पडद्यावरील लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये काम केले होते. तर भाऊबळी, उनाड, झोंबिवली, या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. संगीत बिबट आख्यान या नाटकातही त्याने काम केले होते. अलीकडेच सन मराठी वृत्तवाहिनीवर सुरू झालेल्या सखा माझा पांडुरंग मालिकेतही तो भूमिका साकारत होता.
तुषारचा जवळचा मित्र ankur vadhve अंकुर वाढवेने समाज माध्यमावर त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अंकुरने या पोस्टमध्ये लिहिले, तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो. तुझ्या आठवणी कायम आमच्यासोबत राहतील.