Massive Rockfall in Kullu Buries Two Under Rubble; Himachal Hit by Torrential Rains
Rockfall Buries 2 in Kullu – मागील आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश(Himachal Pradesh) , जम्मू काश्मीर ,(Jammu & Kashmir) पंजाब, नवी दिल्लीत हाहाःकार माजला आहे. हिमाचलच्या कुल्लू जिल्ह्यात एक मोठा डोंगरकडा मुसळधार पावसाने एका घरावर कोसळला. या घटनेत दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. एनडीआरएफचे(NDRF) जवान सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते.
कुल्लू जिल्ह्यातील आखाडा बाजार परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण घटना घडली. डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने पायथ्याशी असलेल्या काही घरांची पडझड झाली. तर एक घर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी एक काश्मीरी मजूर आणि एक एनडीआरएफचा जवान असल्याचे सांगण्यात आले.
मंडी जिल्ह्यातील (Mandi)सुंदरनगर उपमंडळातील जमंगबागच्या बीबीएमबी कॉलनीमध्येदेखील मोठी दरड कोसळली. या घटनेत दरडीचा भाग दोन घरांवर कोसळून ६ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. बचाव कार्य करणाऱ्या पथकाने सहा जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली एक जण आपल्या दुचाकीसह गाडला गेला होता. प्रकाश शर्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. ते डढ्याल येथील रहिवासी होते.
कुल्लू आणि मंडीबरोबरच राज्याच्या अनेक भागांत पावसाने मोठी वाताहात घडवून आणली आहे. राज्यातील १२७७ छोटे रस्ते पावसाच्या पाण्यात अर्धेअधिक वाहून गेल्याने ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. तर पाच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यांनी राज्य आपत्तीग्रस्त घोषित केले असून ज्या घरांचे पडझडीत मोठे नुकसान झाले आहे त्या कुटुंबांना प्रत्येकी सात लाख रुपयांची आणि घरातील सामानासाठी अधिकचे ७० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली. घरांचे किरकोळ नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.
हिमाचल प्रदेश प्रमाणेच जम्मू आणि काश्मीर तसेच पंजाबमध्येदेखील संततधार पावसाने हांहाकार माजला आहे. पंजाबमध्ये २३ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक भागांत आजही मुसळधार पाऊस सुरू होता. सुमारे १२०० गावे पाण्याखाली गेली असून पूरस्थितीत आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. येथे राज्य सरकारने ७ सप्टेंबरपर्यंत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
दिल्लीत यमुना नदीला पूर आल्याने आसपासच्या वस्त्यांमध्ये गुडघाएवढे पाणी साचले आहे. सुमारे १० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
राहुल गांधींचे (Rahul Gamdhi) मोदींना मदतीचे आवाहन
पंजाब,जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये पावसामुळे झालेल्या वाताहातीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
मोदी जी, पंजाबमध्ये पुराने थैमान घातले आहे. जम्मू -काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा संकट समयी आपण या परिस्थितीकडे जातीने लक्ष देणे तसेच केंद्र सरकारच्या वतीने सक्रिय मदत मिळवून देणे आवश्यक आहे. हजारो लोक आपले घर, आपला जीव आणि आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत,असा संदेश राहुल गांधी यांनी या व्हिडिओद्वारे दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Arun Gawli अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अखेर तुरूंगाबाहेर! १८ वर्षांनी जामीन
Maratha Protest मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल
Honda Activa 6G की TVS Jupiter 110? तुमच्यासाठी कोणती स्कूटर आहे सर्वोत्तम? जाणून घ्या