Meat sale banned in Kalyan-Dombivli! MVA leader objects
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी (Meat sale ban Kalyan-Dombivli)घालण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला उबाठा आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar)आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी पालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चालकांना नोटीस पाठवून १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने आणि मांसविक्री बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.(Maharashtra meat sale restrictions)
यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की,आम्ही काय खायचे किंवा नाही हे ठरवणारे आयुक्त कोण? ते का सांगतील आम्ही शाकाहार करायचा की मांसाहार? डोंबिवलीतील पलावा येथील रस्ता खराब झाला आहे, त्याकडे लक्ष दिले जात नाही आणि उलट चिकन, मटण विक्रीवर बंदी घातली जाते. या आयुक्तांना निलंबित केले पाहिजे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की,कल्याण-डोंबिवलीत मासविक्री बंद करण्याचा निर्णय हा स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. लोकांनी कधी काय खावे आणि विकावे यावर कोणाच्याही बापाचे राज्य नाही. ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्याच दिवशी आमचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. आदेश काढणारी ही गायकवाड बाई कोण आणि तिला अधिकार कोणी दिला? शासन नावाचे अस्तित्व आहे की नाही?