Metro 3 stations in Girgaon and Kalbadevi have 745 project-affected people
मुंबई – कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ metro 3 प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांमुळे बाधित होणाऱ्या ७४५ प्रकल्पग्रस्तांची यादी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) निश्चित केली आहे. यापैकी २५९ प्रकल्पग्रस्त हे काळबादेवी स्थानकामुळे बाधित होणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीकृत लॉटरीच्या माध्यमातून बाधितांची निवड केली जात आहे. पहिल्या टप्प्यात काळबादेवी येथील ९० प्रकल्पग्रस्तांचे काळबादेवी हाईटस् या प्रकल्पातील के-३ (कामिनीवाडी) इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. अशाच प्रकारे उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात येणार आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या राहत्या घरापासून जवळच सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी घरे देण्याचे उद्दिष्ट्य आहे,अशी माहिती एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले. मेट्रो-3 प्रकल्पात गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांच्या उभारणीत अभियांत्रिकीशी संबंधित तसेच भूसंपादनाशी संबंधित आलेल्या अडथळ्यांमुळे हा प्रकल्प काहीसा रखडला,अशी कबुलीही या अधिकाऱ्याने दिली.