Minta Devi scores 124 not out! opposition Protest by wearing a T-shirt.
नवी दिल्ली – बिहारमधील (bihar voting)मतदार यादीतील कथित घोटाळा (scam)आणि एसआयआरविरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आजही निषेध नोंदवला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदार मिंता देवी यांचा फोटो असलेले टी-शर्ट घालून आंदोलनात (Political protest)सहभागी झाले. या टी-शर्टच्या मागील बाजूस १२४ नॉट आऊट(Minta Devi 124 not out) असा मजकूर होता.
काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gndhi) यांनी मतदार चोरीच्या मुद्द्यावर सादर केलेल्या अहवालात १२४ वर्षीय मिंता देवी यांचा उल्लेख केला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या बिहारच्या मसुदा मतदार यादीत मिंता देवी यांचे वय १२४ वर्षे दाखवण्यात आले आहे. ते जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीच्या वयापेक्षा नऊ वर्षांनी जास्त आहे. याबाबत काँग्रेस खासदार मणिकम टागोर म्हणाले की, यावरून निवडणूक आयोगाच्या कारभाराचे अपयश स्पष्ट होते. राजीव कुमार आणि ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोग भाजपाचा (bjp0विभाग झाल्यासारखा आहे. मिंता देवी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, पण त्यांचे वय १२४ वर्षे दाखवले आहे. यावर संसदेत चर्चा व्हावी.
या आंदोलनानंतर लोकसभा(loksabh) आणि राज्यसभेचे (rajysabha)कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी बिहार मतदारयादी पडताळणीवर चर्चा करण्याची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.