Model Sheetal’s murder! Accused boyfriend arrested
हरियाणा – हरियाणाची Hariayana model मॉडेल शीतल उर्फ सिम्मी चौधरी (२४) हिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर सुनील याला पोलिसांनी अटक केली आहे. सुनीलनेच शीतलची हत्या करून कार कालव्यामध्ये फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शीतल ही हरियाणवी संगीत क्षेत्रात काम करत होती. शीतल आणि तिची बहीण नेहा या दोघीच पानिपतच्या सत्कर्षण कॉलनीत राहत होत्या. १४ जून रोजी शूटिंगसाठी गेलेली शीतल घरी न परतल्याने नेहाने पानिपतच्या जुने औद्योगिक पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू असतानाच रविवारी रात्री हरियाणातील सोनीपतमध्ये खांडा गावातून जाणाऱ्या रिलायन्स कालव्यात ग्रामस्थांना एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी पाहणी केली असता हा मृतदेह शीतलचा असल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शीतलच्या गळ्यावर चाकूचे वार आढळले आहेत. ती शनिवारी शूटिंगसाठी पानिपत अहार गावात गेली होती. ती परत न आल्याने तिच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शीतलचा मृतदेह सापडण्यापूर्वी शनिवारी सकाळी दिल्ली समांतर कालव्यातून एक कार सापडली, ही कार इसराना येथील रहिवासी सुनील चालवत होता.
नेहाने सांगितले की, शीतलने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास मला व्हिडिओ कॉल केला होता आणि तिने सुनील तिला मारहाण करत असल्याचे सांगितले होते. नंतर शीतलचा फोन बंद झाला. सुनीलने शीतलची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. शीतल विवाहित होती आणि तिला एक लहान बाळ होते. पण ती काही महिन्यांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. सुनील विवाहित आहे आणि त्याला मुले आहेत हे समजले होते, असे शीतलला नुकतेच समजले होते. त्यामुळे तिने सुनीलपासून दूर राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुनील तिच्यावर नाराज होता. यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. या भांडणातूनच सुनीलने शीतलच्या हत्या केली.