Name Found in Two Constituencies, Congress Spokesperson Gets Notice! Pawan Khera in Trouble
Khera Gets EC Notice – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर आता निवडणूक आयोगाने (Election Commission) काँग्रेसवरच (Congress) पलटवार करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांचे नाव दोन मतदारसंघात आढळल्यामुळे आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. मतदारांच्या नावाची छाननी करण्याची जबाबदारी आयोगाची असून त्यांनीच यातील एक नाव गाळायला हवे होते, असे पवन खेरा (Pawan Khera) यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसीत म्हटले, की पवन खेरा यांचे नवी दिल्लीतील (New Delhi) काका नगर आणि जांगपूर निझामुद्दीन अशा दोन पत्त्यांवर मतदार यादीत नाव आहे. त्यामुळे त्यांनी या नावाबद्दल काही कारवाई का केली नाही, याची कारणे द्यावीत. हा एक गुन्हा आहे. यावर खेरांनी म्हटले, की निवडणूक आयोग मतदारांची नोंदणी (voter lists) करत असते. त्यामुळे दोन मतदारसंघात नाव असल्याचे ते वगळण्याची जबाबदारी आयोगाची आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या महादेवपुरामध्ये हजारो दुबार मतदार समोर आले. या प्रकरणांमध्ये आयोगाने कोणाला नोटीसा दिल्या का?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीविषयी (mishandling voter lists) पत्रकार परिषद घेऊन आयोगाचा कारभार समोर आणला होता. त्यावर आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती. मात्र वाढीव मतदानाच्या वेळेसचे व्हिडीयो माताबहिणींच्या व्यक्तीगत प्रतिमेचे हनन होईल म्हणून द्यायला विरोध केला होता. त्यानंतर आता एका एका काँग्रेस नेत्यावर कारवाई करून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न आयोग करत आहे का, अशी चर्चा राजधानी दिल्लीत सुरु झाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
जरांगे पाटील रूग्णालयात प्रकृती नाजूक असल्याने १५ दिवस विश्रांतीचा सल्ला
Zomato च्या ग्राहकांना मोठा झटका! जेवण मागवण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे
Samsung च्या लोकप्रिय स्मार्टफोनवर तब्बल 50 हजारांची सूट; पाहा कुठे मिळतेय ही ऑफर