न्यु इंडिया सारस्वत बँकेत विलीन ! संपूर्ण ठेवी १०० टक्के सुरक्षित ! १ ऑगस्टपासून व्यवहार सुरू

New India’ will be under Saraswat Bank

मुंबई – भ्रष्टाचार प्रकरणामुळे (corruption case,) रिझर्व्ह बॅंकेने (RBI) कडक निर्बंध लादलेली न्यु इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता सारस्वत बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे न्यू इंडिया बँकेतील (New India Co-operative Bank) ठेवीदारांच्या सर्व ठेवी १०० टक्के सुरक्षित आहेत,असे सारस्वत बँकेने सर्व ठेवीदारांना आश्वासित केले आहे. १ ऑगस्टपासून न्यु इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवहार (transactions)सारस्वत बँकेच्या नावाने सुरू होणार आहे.

सारस्वत बँकेने (Saraswat Bank)न्यू इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक विलिनीकरणाचा प्रस्ताव (proposal)रिझर्व्ह बॅंकेला दिला होता.या प्रस्तावाला रिझर्व्ह बॅंकेने संमती दिल्यानंतर दोन्ही बँकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता १ ऑगस्टपासून ‘न्यू इंडिया’ चे व्यवहार सारस्वत बँकेच्या नावाने सुरू होणार आहेत. असे असले तरी ठेवीदारांनी पहिल्या ठेवी काढण्यासाठी बॅंकेत गर्दी करू नये,असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे (Grahak Panchayat President Adv. Shirish Deshpande) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांवर बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आल्याने १३ फेब्रुवारी २०२५ पासून रिझर्व बँकेने कडक निर्बंध लादले होते. त्याचप्रमाणे ठेवीदारांना ४५ दिवसांत विम्यापोटी ५ लाखांपर्यंतच्या ठेवी (₹5 lakh within 45 day) परत करण्याची घाई रिझर्व बँकेने केली होती. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरून ही बँक आता बुडणार असे चित्र उभे राहिले होते.परंतु सुदैवाने आता ही बँक सारस्वत बँकेत विलीन झाली आहे.त्यामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.