रेल्वे तिकीट संख्येच्या २५ टक्केच वेटिंग तिकिटे! प्रशासनाचा निर्णय

Only 25% of total train tickets to be kept under waiting list quota!

Only 25% of total train tickets to be waiting list quota! dicision on railway

नवी दिल्ली – रेल्वे प्रशासनाने indian railway रेल्वेतील एकूण प्रवासी संख्येच्या २५ टक्केच 20 % वेटिंग तिकिटे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोणत्याही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठी वेटिंग लिस्ट waiting list quota(प्रतीक्षा यादी) नसेल. तिकीट यंत्रणेत सुधारणा करण्याच्या व प्रवाशांची गाडीतील गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. हा नियम सर्व वर्गांसाठी लागू होणार आहे.dicision on railway

याबाबत रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या सर्व विभागांना आदेश पाठवले आहेत. त्यानुसार प्रतीक्षा यादीच्या तिकिटांची संख्या प्रत्येक वर्गातील एकूण तिकिटांपेक्षा २५ टक्क्यांपेक्षा अधिक नसेल. यापूर्वी प्रतीक्षा यादीला कोणतीही मर्यादा नव्हती. सण व सुट्ट्यांमध्ये स्लीपर वर्गात ३०० पेक्षा अधिक, तर एसीमध्ये १५० पेक्षा अधिक वेटिंग होत होते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. पक्के (कन्फर्म) तिकीट नसणारे प्रवासीदेखील ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यामुळे गाडीत पाय ठेवायलाही जागा होत नव्हती. यासारख्या असंख्य समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा नवा निर्णय घेतला आहे.