Panchayat Season 4 : ‘पंचायत’ सीझन 4 ची घोषणा, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Panchayat Season 4 | ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या (Panchayat Web Series) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या या सीरिजला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘प्राइम व्हिडीओ’ने ‘पंचायत 4’ ची घोषणा केली आहे. ‘पंचायत 4’ येत्या 5 जुलैपासून (Panchayat 4 Release Date) ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे.

या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन प्रदर्शित झाला, त्यालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. त्यानंतर गेल्या वर्षी तिसऱ्या सीझननेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंत आता चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. एका प्रोमोच्या माध्यमातून सोशल मीडियावर नवीन सीझनची घोषणा करण्यात आली. 

काय आहे ‘पंचायत’ची गोष्ट?

‘पंचायत’ ही एक हलकीफुलकी कॉमेडी-ड्रामा सीरिज (comedy-drama) असून, याची कथा अभिषेक या इंजिनिअर पदवीधराच्या गावात सचिव म्हणून आलेल्या प्रवासाभोवती फिरते. उत्तर प्रदेशमधील फुलेरा नावाच्या काल्पनिक गावात घडणारी कथा यात दाखवण्यात आली आहे..

गेल्या सीझनमध्ये (Panchayat Season 3) ‘प्रधानजी’ यांना गोळी लागून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. तसेच,सचिव, विकास आणि प्रल्हाद यांचा विधायक भूषणशी वाद होतो. आता चौथ्या सीझनमध्ये पुढे काय घडणार? प्रधानजी वाचतील का? सचिवजी आणि रिंकीचं (Rinki) लग्न होईल का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे..

‘पंचायत ४’ मध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा हे कलाकार दिसणार आहेत. ‘पंचायत ४’ ची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी केली आहे. तर चंदन कुमार यांनी कथा लिहिली आहे. तसेच दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी केले आहे.