Phone tapping of CM Revanth Reddy causes a stir in Telangana politics
हैदराबाद – भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) (BRS)प्रमुख के चंद्रशेखर राव(Chandrashekhar Rao)यांच्या सरकारने तेलंगणाचे काॅंग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Reddy)यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निकटवर्तीयांचे फोन टॅपिंग केले होते. त्यांच्यावर पाळत ठेवली होती,(Revanth Reddy phone surveillance)अशी माहिती उघड झाल्याने तेलंगणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.(BRS vs Congress Telangana)
जुलै २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ही पाळत ठेवण्यात आली होती. त्या काळात तेलंगणात काँग्रेस विरोधी पक्षात होती. तर रेवंत रेड्डी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि तेलंगणा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
बीआरएस सरकारच्या काळात सन २०१४ ते २०२४ या कालावधीत तेलंगणाच्या विशेष गुप्तचर शाखेने सुमारे ६०० लोकांचे फोन टॅप करून त्यांच्यावर पाळत ठेवली होती,असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिध्द केल्याने ही माहिती उघड झाली आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएसचा पराभव केला . त्यानंतर काँग्रेसने या फोन टॅपिंग आणि पाळत प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यातून असे आढळून आले की बीआरएस सरकारच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्याव्यतिरिक्त उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, व्यापारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बालपणाचे सवंगडी यांच्यावरही पाळत ठेवण्यात आली होती.