पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी ! रूग्णालयात जखमींची विचारपूस

Prime Minister Narendra Modi visited the Ahmedabad crash site toda


अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आज सकाळी साडे आठ वाजता अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले. तेथून ते थेट अपघात स्थळी पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी करून मोदींनी (hospital visit) सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.या अपघातातून बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार याच्याशी थेट संवाद साधून अपघात झाला तेव्हा नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मोदींनी या अपघातात मरण पावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Gujarat Chief Minister Vijay Rupani)यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. विजय रुपाणी अत्यंत नम्र आणि मनमिळावू स्वभावाचे नेते होते. पक्षाच्या तत्वांशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही.त्यांच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे,असे मोदी म्हणाले.
दिल्लीला परतताना विमातळालगतच्या गुजसेल इमारतीमध्ये मोदींनी गुजरात सरकारमधील अधिकारी, एअर इंडियाचे उच्चपदस्थ अधिकारी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी आणि अपघाताचा तपास करणाऱ्या तंत्रज्ञानांच्या पथकातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.बैठकीत अधिकाऱ्यांनी मोदींना अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मोदींनीही अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या.
या अपघाताने आपण सारे हादरून गेलो आहोत.अशा प्रकारे काही क्षणांत एवढ्या लोकांचे बळी जाणे ही घटनाच ह्रदय हेलावून टाकणारी आहे.त्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही.मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो.आप्तेष्टांच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघण्यासाठी बराच काळ जावा लागेल.ओम शांती ! अशा शब्दात दिल्लीला परतताना मोदींनी एक्स पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या.