Pune’s Ganesh Visarjan Stuck ! End After 32 hours
Pune Ganesh Visarjan – पुण्यातील पारंपरिक आणि भव्य गणेश विसर्जन मिरवणूक पुणे पोलिसांनी नियोजन करूनही रेंगाळण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली. काल सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुकांची 32 तासांनंतर सांगता झाली .
पुणे पोलिसांनीच्या नियोजनाप्रमाणे पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन अपेक्षित वेळेत पार पडले. कसबा गणपतीचे(Kasba Ganpati) दुपारी ३.४७ वाजता, तांबडी जोगेश्वरीचे (Tambdi Jogeshwari) ४.१० वाजता, गुरुजी तालीमचा(Guruji Talim) ४.३५ वाजता, तुळशीबाग गणपतीचे (Tulshibaug Ganpati)४.५९ वाजता, तर केसरीवाडा गणपतीचे (Kesariwada Ganpati) ५.३९ वाजता विसर्जन झाले. या मिरवणुका ६ ते ८ तासांत पार पडल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) मिरवणूक सायंकाळी ४ वाजता सुरू होऊन रात्री ९.२३ वाजताच्या सुमारास संपली. भाऊ रंगारी गणपतीचे विसर्जनही वेळेत पूर्ण झाले.
परंतु पोलिसांनी मध्यरात्री डीजे थांबवल्यामुळेअनेक मंडळांनी मिरवणूक थांबवली. आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास डीजे पुन्हा सुरू झाल्यानंतर मिरवणुका पुन्हा सुरू झाल्या होत्या.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात उपोषण ! शेतकऱ्याला मारहाण
Raja Raghuvanshi सोनमच्या समोरच राजा रघुवंशीची हत्या! 5 जणांविरुद्ध आरोपपत्र
SSMB 29 Movie: तब्बल 120 देशात रिलीज होणार एस.एस. राजामौली यांचा नवीन चित्रपट, बजेट ऐकून थक्क व्हाल