सावरकरांवरील वक्तव्या प्रकरणी राहुल गांधींना कोर्टाचा दिलासा

Rahul Gandhi gets relief from court in Savarkar remarks case

Rahul Gandhi gets relief from court in Savarkar remarks case


मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar controversy) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणीच्या एका प्रकरणात विशेष न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना दिलासा देत सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची याचिका फेटाळली.
राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात एका पुस्तकाचा हवाला देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काही आरोप केले होते. त्यावरून सात्यकी सावरकर यांनी विशेष आमदार-खासदार न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरूध्द बदनामीचा खटला दाखल केला आहे.(Rahul Gandhi court relief)
खटल्याच्या सुनावणीत राहुल गांधी यांनी ज्या पुस्तकाच्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप केले त्या पुस्तकाची प्रत उपलब्ध करून देण्याचे आदेश राहुल गांधी यांना देण्यात यावेत, अशी मागणी सात्यकी सावरकर यांनी केली होती.
विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायासनासमोर याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी आरोपीकडे त्याच्या गुन्ह्याचा पुरावा मागणे हे न्यायाच्या तत्त्वाला धरून नाही. तसा आदेश देणे आरोपीच्या स्वतःचा बचाव करण्याच्या घटनादत्त अधिकाराचे हनन ठरेल,असे निरीक्षण नोंदवून न्या. शिंदे यांनी सत्यकी सावरकर यांची याचिका फेटाळली.