मुंबई – ऑपरेशन सिंदूरसारख्या(Operation Sindoor controversy) सैन्य कारवायांमध्ये राजकारण घुसवणाऱ्या, प्रत्येक सैनिकी कारवाईमध्ये धर्म घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांचे कोर्ट मार्शल केले (Court martial demand for Amit Shah)पाहिजे,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला.(Sanjay Raut slams Amit Shah)
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे म्हणणाऱ्या शहांना पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ला एकत्र असणे कसे काय चालते,असा सवाल राऊत यांनी विचारला.(Political row over Sindoor operation)
अमित शहा यांचे पुत्र जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांनीच भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे नियोजन केले असेल. हे अमित शहा मुकाट खपवून घेतात आणि दुसरीकडे देशप्रेमाच्या बाता मारत बसतात,असे राऊत म्हणाले.(Sanjay Raut vs BJP)
पहलगाम हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण सपशेल अपयशी ठरल्याचे क्लेशदायक चित्र अवघ्या देशाने पाहिले. (Modi foreign policy criticism)मात्र तरीही मोदींना ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेताना जराही शरम वाटली नाही,अशी टीका राऊत यांनी केली.
