Home / News / सांगली जिल्हा बँक अपहार ७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले

सांगली जिल्हा बँक अपहार ७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले

सांगली- शासनाकडून (goverment) शेतकर्‍यांना (farmers) भरपाई, अनुदान स्वरुपात निधी दिला जातो. सांगली जिल्हा बँकेतील अशाच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी...

By: Team Navakal
https://www.navakal.in/uncategorized/sangli-district-bank-embezzlement-7-employees-dismissed/

सांगली- शासनाकडून (goverment) शेतकर्‍यांना (farmers) भरपाई, अनुदान स्वरुपात निधी दिला जातो. सांगली जिल्हा बँकेतील अशाच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी बँकेतील सात कर्मचार्‍यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे.या सात कर्मचार्‍यांनी मिळून विविध शाखांमध्ये २ कोटी ११ लाख ६० हजार ८२४ रुपयांचा अपहार (fraud) केल्याचे उघड झाले आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा बसर्गी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केट यार्ड तासगाव), बाळासाो नारायण सावंत (औ. वसाहत पलूस), प्रताप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे व दिगंबर पोपट शिंदे (शाखा नेलकरंजी) यांचा समावेश आहे. या अपहारप्रकरणी अजून १८ कर्मचार्‍यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे. या बँकेत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकर्‍यांची ही मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे.या रकमेत बॅंकेच्या काही शाखांमध्ये कर्मचार्‍यांनीच अपहार केल्याच्या घटना वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या आहेत.वास्ताविक हा अपहारही चार ते पाच वर्षापूर्वी झाला आहे. मात्र बॅंकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बॅंकेच्या सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरू केल्याने त्यात हे घोटाळे पहिल्यांदा उघडकीस आले.शाखाधिकारी व लिपिक, काही ठिकाणी शिपाई यांनी संगनमताने शेतकर्‍यांच्या मदतीवर घाला घातला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या