Kurla dairy कुर्ला मदर डेअरी वाचवा पदयात्रा पोलिसांनी थांबवली

Save Kurla Mother Dairy march stopped by police

Save Kurla Mother Dairy march stopped by police

मुंबई – धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत(Kurla Mother Dairy Protest) अपात्र रहिवाशांच्या(Dharavi Redevelopment Project) पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरीची २१ हेक्टर जागा वापरण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. (Kurla Land Dispute)या पार्श्वभूमीवर कुर्लावासीयांनी आज मदर डेअरीपासून मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. (Save Kurla Green Space)मात्र ही पदयात्रा सुरू होण्यापूर्वीच नेहरू नगर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

राज्य सरकारने धारावीतील (Maharashtra Government Dharavi Plan)अपात्र रहिवाशांना घरकूल देण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) शहरातील विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये कुर्ला परिसरातील हिरवळीने भरलेली मदर डेअरीच्या जागेचादेखील समावेश आहे. मात्र, ही जागा सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवावी, अशी मागणी कुर्लावासीयांनी केली आहे.

या मागणीला सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासावर धडक देण्याचे ठरवले. पण नेहरू नगर पोलिसांनी पदयात्रा सुरू होण्याआधीच आंदोलनात सहभागी कार्यकर्ते किरण पहिलवान, स्नेहल पहिलवान, श्रीकांत पत्की, विद्या इंगवले यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेले.