Sharad Pawar Behind Jarange’s Protest? Shashikant Shinde Challenges Allegations
Pawar Behind Stir? NCP Hits Back – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्या आंदोलनामागे(NCP) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)यांनी प्रतिआव्हान देत आंदोलनामागे पवारांचा हात आहे, असे वाटत असेल तर सरकारने ते सिद्ध करून दाखवण्यास सांगितले.
आमदार शिंदे म्हणाले, की सरकारकडे तपास यंत्रणा आहेत. खरंच पवार आंदोलनामागे असतील तर त्याचे पुरावे सादर करा. एकीकडे म्हणता पवारांनी भूमिका स्पष्ट करावी आणि दुसरीकडे त्यांनी काही मत व्यक्त केले की लगेच आंदोलनामागे त्यांचा अदृश्य हात असल्याचा आरोप केला जातो. हे दुटप्पी धोरण थांबवावे.
ते पुढे म्हणाले, जरांगे पाटील हे स्वयंस्फूर्तीने आंदोलन करत आहेत की मराठा समाज स्वतःहून रस्त्यावर उतरला हे सरकारने ठरवावे. मात्र केवळ राजकीय आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे अयोग्य आहे. सरकारने या आंदोलनाची दखल गांभीर्याने घ्यावी आणि समितीच्या अहवालांची वाट न पाहता तात्काळ बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
अफगाणिस्तानात 6.3 तीव्रतेचा भूकंप 800 जणांचा मृत्यू तर हजारो जखमी
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर, नक्की कारण काय? जाणून घ्या