Home / News / द. आफ्रिकाच्या राष्ट्रपतींकडून मोदींना जल गुंतवणूक परिषदेसाठी आमंत्रण

द. आफ्रिकाच्या राष्ट्रपतींकडून मोदींना जल गुंतवणूक परिषदेसाठी आमंत्रण

South African President Invites PM Modi to Water Investment Conference

South African President Invites PM Modi to Water Investment Conference

केपटाउन – दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा(South Africa president) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)तसेच इतर जागतिक नेत्यांना ग्लोबल आउटलुक कौन्सिल ऑन वॉटर इन्व्हेस्टमेंट्स (Water Investment Conference 2025)या परिषदेत सदस्य म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण दिले(Modi invited to water summit) आहे. जी-२० अंतर्गत सुरू झालेल्या या नव्या जागतिक उपक्रमाचा उद्देश जल गुंतवणुकीला राजकीय आणि आर्थिक चर्चेच्या केंद्रस्थानी आणणे हा आहे.(PM Modi South Africa Visit)

या प्लॅटफॉर्मद्वारे जी-२०, संयुक्त राष्ट्र, बहुपक्षीय विकास बँका आणि खासगी क्षेत्र यांच्यासोबत भागीदारी करून जल गुंतवणुकीच्या प्रगतीचे परीक्षण केले जाईल आणि त्यावर वार्षिक अहवाल सादर केला जाईल. रामाफोसा (South African President invites Modi)यांनी सांगितले की, या कौन्सिलमध्ये पंतप्रधान मोदींसह ब्राझीलचे राष्ट्रपती लुइझ इनासिओ लूला दा सिल्वा, मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबाउम, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन तसेच अफ्रिकेतील अनेक देशांचे नेते सहभागी होणार आहेत. ही परिषद जागतिक स्तरावर पाण्याच्या सुरक्षित आणि शाश्वत वापरासाठी गुंतवणुकीचे मार्ग मोकळे करण्याच्या उद्दिष्टाने कार्य करणार आहे.(India diplomacy water)