Stampede at Ausneshwar Temple in Barabanki! Two dead.
लखनौ – उत्तर प्रदेशातील बाराबंकी (Barabanki)जिल्ह्यातील औसनेश्वर महादेव (Ausneshwar temple)मंदिरात चेंगराचेंगरी(Temple stampede) झाली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू (Two dead)झाला. यामध्ये प्रशांत (२२) याच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. तर ३० पेक्षा जास्त (Uttar Pradesh accident)भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की,हैदरगड येथील औसनेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवार निमित्त जलाभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. याच वेळी माकडांनी मंदिरावरून गेलेल्या विजेच्या तारेचे नुकसान केले. ही तुटलेली वायर मंदिराच्या टिनच्या शेडवर पडली. त्यामुळे शेडमध्ये विद्युत प्रवाह पसरला आणि भाविकांमध्ये (Barabanki temple incident)अचानक भीती पसरली. ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. बाराबंकीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अवधेश कुमार यादव यांनी सांगितले की, हैदरगड आरोग्य केंद्रात दाखल केलेल्या रुग्णांपैकी एक वगळ(Religious place accident)
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Aditynath) यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्यापोस्टनुसार मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने मदत व बचावकार्य राबविण्याचे निर्देश दिले.