CM Fadanvis at wardha पालिका निवडणुका महायुतीत लढायच्या !भाजपाचे वर्चस्व कायम

Sthanik swarajya sanstha elections to be contested with Mahayuti alliance

Sthanik swarajya sanstha elections to be contested with Mahayuti alliance

वर्धा – वर्ध्यात आज भाजपाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Sthanik swarajya sanstha)निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम येथे मंथन बैठक झाली. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित(CM Fadanvis)म्हणाले की, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक होईल. कदाचित सर्वात अखेरीस (BJP dominance)महापालिकेची निवडणूक होईल. या निवडणुका आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत. स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ. जेथे अडचणी असतील (Municipal elections Maharashtra)तेथील लोकांनी आमच्याशी चर्चा करावी.पण शक्यतो निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत.जेथे महायुतीत निवडणूक होणार नाही तेथे आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही. आपण राज्यात सोबत काम करत आहोत.समन्वय ठेवून मैत्रीपूर्ण लढत करण्याचे नियोजन आहे.परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व दाखवून द्यायचे आहे.(Election campaign India)आपण २०१७ मध्ये उद्धव ठाकरे आपल्यासोबत सत्तेत होते. रोज आपल्यालाच शिव्या द्यायचे, ते आपल्याला करायचे नाही.