Home / News / Stock Market : शेअर बाजारात माफक तेजीजी ; एसटी निर्णयांचा परिणाम

Stock Market : शेअर बाजारात माफक तेजीजी ; एसटी निर्णयांचा परिणाम

stock market

Stock Market : वस्तू आणि सेवा कर (GST Council) परिषदेच्या बैठकीत काल झालेल्या निर्णयांचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावर (Domestic stock market) दिसून आला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत माफक तेजी दिसून आली. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत मोठी घसरण झाली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty)आज १९ अंकांच्या वाढीसह २४,७३४ अंकांवर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex )१५० अंकांनी वाढून ८०,७१८ अंकांवर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक (Midcap index) ४४४ अंकांनी घसरून ५६,९०० अंकावर तर स्मॉलकॅप-१०० निर्देशांक १,३५४ अंकांच्या घसरणीसह १७,६१० अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारांत बहुतांश समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील बहुतांश समभागांमध्ये घसरण झाली. विशेषतः मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India), भारत इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (Bharat Electronics), एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


 मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल

कार्तिक आर्यन होणार अमिताभ बच्चन-क्रिती सेनॉनचा शेजारी

चंद्रपुरात गणेशोत्सव मंडपावरून मुनगंटीवार-जोरगेवार आमनेसामने