Stop the Garba Classes Craze! BJP Leaders Demand in Gujarat
अहमदाबाद – नवरात्रोत्सव अवघ्या दीड महिन्यावर आला असताना गुजरातमध्ये उत्सवाच्या (Gujarat Garba)काही दिवस आधी जागोजागी सुरू होणाऱ्या गरबा क्लासेसच्या मुद्यावरून गदारोळ (Garba classes controversy)माजला आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि पाटीदार युवा सेवा संघचे संस्थापक मनोज पिनारा(Manoj Pinara) यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या (BJP leaders on Garba training)जनक्रांती सभेत गरबा क्लासच्या मुद्यावर जोरदार चर्चा झाली. उपस्थित जवळपास सर्वच प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि भाजपा आमदारांनी गरबा आणि दांडीया क्लासेसवर बंदी घालण्याची मागणी केली.(Navratri)
सुरुवातीला सांस्कृतिक देवाण-घेवाण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गरबा क्लासेसनी बघता बघता व्यवसायाचे स्वरूप घेतले आहे. गरबा क्लासेसच्या नावाखाली तरुण-तरुणींचा एकत्र येऊन धिंगाणा घालणे सुरू झाले. त्यामुळेच या गरबा क्लासना विरोध होऊ लागला आहे.
भाजपाच्या काही आमदारांनी असाही आरोप केला की गरबा शिकण्याच्या नावाखाली अन्य धर्मीय लोक हिंदू तरुणींना आपल्या प्रेमजालात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत आहेत. अशा लोकांसाठी गरबा क्लासेस हे हिंदू तरुणींना हमखास फूस लावण्याची ठिकाणे बनली आहेत. त्यामुळे या गरबा क्लासवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.