Home / News / २० ऑगस्टनंतर सूर्यदर्शन पंजाब डख यांचा अंदाज

२० ऑगस्टनंतर सूर्यदर्शन पंजाब डख यांचा अंदाज

Sun likely to shine in Maharashtra after August 20: Punjab Dakh’s forecast

Sun likely to be visible after August 20 – forecast by Punjab Dakh

मुंबई – राज्यात २० ऑगस्टनंतर सूर्यदर्शन होणार आहे. (August 20 sun forecast )त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याचा अंदाज हवामान निरीक्षक(Punjab Dakh weather prediction)पंजाब डख यांनी वर्तवला आहे.
पंजाब डख यांनी सांगितले की, १७ ऑगस्टच्या रात्रीपासून ते २० ऑगस्टपर्यंत राज्यात अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पावसाचा जोर (Vidarbha and Marathwada)विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये जास्त जाणवणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १८ ते २० ऑगस्टदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अचलपूर, परतवाडा, दर्यापूर या भागांतही पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव अधिक राहील. काही ठिकाणी कमी वेळात अधिक पावसामुळे पूरस्थिती उद्भवू शकते. (Maharashtra agriculture weather)उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागांतही २१ ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे नदी-नाल्यांत पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबई, कोकण आणि नाशिक या भागांमध्ये १८ ते २१ ऑगस्टदरम्यान अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इगतपुरी, जुन्नर, संगमनेर, अहमदनगर, कळसूबाई परिसर आणि कोकणातील जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढेल .२१ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. २१ ते २५ ऑगस्टदरम्यान हवामान कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या कालावधीत शेतीची कामे, फवारण्या, खत टाकणे व मशागत पूर्ण करून घ्यावी.(Cotton and sugarcane pest control)पाणी साचलेल्या भागात पिकांवर फवारणी करावी, कारण पावसानंतर बुरशी व किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. विशेषतः कापूस व ऊस पीक धारकांनी योग्य नियोजन करून खत व औषध फवारणी करून घ्यावी.