Sunetra Pawar Appointed Chairperson of Baramati Medical College Committee, Supriya Sule Removed
Supriya Sule Out & Sunetra Pawar In – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Government Medical College) अभ्यागत मंडळावरून राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना वगळून त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (MP Sunetra Pawar) यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याने हा निर्णय घेतला. या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना शासन निर्णयानुसार झाली. यावेळी नव्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली.या अभ्यागत मंडळात सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेत आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात झाली आहे. यामध्ये ज्योती बल्लाळ,डॉ. कीर्ती पवार,डॉ. सचिन कोकणे,अॅड. श्रीनिवास वायकर,डॉ. दिलीप लोंढे,अविनाश गोफणे,बिरजू मांढरे यांचा समावेश आहे. यापूर्वी या मंडळावर सुप्रिया सुळे यांची कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री संपुष्टात? माजी अमेरिकन सुरक्षा सल्लागाराचा मोठा दावा
थेट अजित पवारांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?