Supreme Court Slams ED
नवी दिल्ली – राजकीय लढाई ही मतदारांसमोर (Supreme Court on ED)लढली गेली पाहिजे. त्यात तुम्ही कशाला तुमचा वापर करु देता. अशा शब्दात आज सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सक्तवसुली संचालनालयाला अर्थात ईडीला(ED)सुनावले. मला महाराष्ट्रापासून (Maharashtra)अशा प्रकारच्या प्रकरणाची माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका असेही त्यांनी खडसावले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज कर्नाटकचे (karanataka )मुख्यमंत्री सिद्धरामय्या(cm) यांच्या पत्नी पार्वती यांच्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे खडे बोल सुनावले. कर्नाटकातील कथीत(land scam) जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांच्यावर आरोप ठेवले होते. त्या प्रकरणी पार्वती यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणारी याचिका ईडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश(bhushan gawai) भूषण गवई व न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या पीठासमोर झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी ईडीची बाजू मांडली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांची याचिका फेटाळून लावत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यावेळी सरन्यायाधीशांनी ईडीच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, आम्हाला तुमच्या विरोधात अधिक कठोर शब्द वापरायला लाऊ नका. तुमच्या कार्यपद्धतीची आम्हाला माहिती आहे. तुम्ही राजकारणात पडू नका. त्यासाठी तुमचा वापर होऊ देऊ नका.