Home / News / हिमाचलच्या ३ विमानतळावरअतिपावसामुळे वाहतूक ठप्प

हिमाचलच्या ३ विमानतळावरअतिपावसामुळे वाहतूक ठप्प

Traffic Disrupted at 3 Airports in Himachal Due to Heavy Rain

Traffic Disrupted at 3 Airports in Himachal Due to Heavy Rain

Rain Halts Travel in North India – हिमाचल प्रदेश, (Himachal Pradesh)उत्तराखंडसह (Uttarakhand)देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन विमानतळांवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक नद्यांना पूर आले असून विविध भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने बंद आहेत. काही रस्त्यांवर दरडी कोसळल्या (Landslides) आहेत.

हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस सुरु असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सिमल्याच्या(Shimla) जुन्गा गावात दरड कोसळून घरातील वडील व मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. कोटखाईमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील कांगडा, सिमला व कुल्लू विमानतळावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली. उत्तराखंडच्या यमुनोत्री महामार्गावर सहा ठिकाणी दरडी कोसळल्या. यमुना नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असून त्यामुळे पुलांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून यमुनोत्री मार्ग बंदच असून रस्त्यावर आलेल्या डोंगराच्या मातीमुळे रस्ता पूर्णपणे खचला आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

सरकारचे २५० आमदार मात्र शरद पवार केंद्रस्थानी ! सुळेंचा भाजपाला टोला

8 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय भारतीय कंपनीचा स्मार्टफोन; 8GB RAM सह अनेक शानदार फीचर्स

डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘मृत्यू’ झाल्याच्या अफवा; स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…