Udaipur Files screening opposition petition rejected by Supreme Court
नवी दिल्ली – उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालाल तेली हत्या प्रकरणावर आधारित उदयपूर फाईल्स या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधातील याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.(Udaipur Files controversy)
११ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी या प्रकरणातील आरोपी मोहम्मद जावेदने याचिका दाखल केली होती. याप्रकरणावर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने(Supreme Court on Udaipur Files) या तातडीने सुनावणीस घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, ही याचिका १४ जुलैला न्यायालय सुट्टीनंतर पुन्हा सुरू झाल्यानंतर योग्य खंडपीठापुढे मांडावी. तोपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन होऊ शकते. कारण चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद वगळले आहेत. याशिवाय या चित्रपटाविरोधात जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेनेही एक स्वतंत्र याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ती याचिकाही प्रलंबित आहे.
या प्रकरणातील आरोपी मोहम्मद जावेद याने याचिकेत नमूद केले की, चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रचार साहित्य एकतर्फी, प्रक्षोभक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आहे. ज्यामुळे देशातील धार्मिक सौहार्द बिघडण्याची शक्यता आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चित्रपटाचे प्रदर्शन न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप होऊ शकते.(Udaipur Files movie ban)
२०२२ मध्ये भाजपाच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. राजस्थानातील उदयपूरचे शिंपी कन्हैयालाल तेली यांनी नुपूर शर्मा विधानाचे समर्थन समाज माध्यमावर केले. त्यानंतर त्यांना सर तन से जुदा करके मारेंगे अशा धमक्या मिळू लागल्या. याबाबत कन्हैयालाल यांनी स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणीही केली होती. २८ जून २०२२ रोजी दोन इस्लामी कट्टरपंथीय ग्राहक बनून त्यांच्या दुकानात आले. त्यांनी कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करून त्या हत्येचा व्हिडीओ शूट करून समाज माध्यमावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी हत्या करण्यामागील कारण म्हणून नुपूर शर्मा यांचे समर्थन दाखवणारी पोस्ट शेअर केली होती.