Uddhav Thackeray to Visit Nashik in the Last Week of July
मुंबई – उद्धव ठाकरे हे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. तर ऑगस्ट महिन्यात ते कोकणात शिवबंधन परिक्रमा करणार आहेत.(Uddhav Thackeray Nashik visit)
नाशिकमध्ये उबाठाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपा व शिंदे गटात प्रवेश गेल्याने उबाठाला खिंडार पडले (Maharashtra politics 2025)आहे. सध्या उबाठाकडे अवघे चार माजी नगरसेवक आणि काही मोजके पदाधिकारी शिल्लक असून ते भाजपा किंवा शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे, पक्षातील अस्थिरता रोखणे आणि आगामी निवडणुकांसाठी तयारी मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः पुढे येत आहेत. त्यांचा नाशिक दौरा हा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्ह्यांचा दौराही(kokan parikrama) करणार आहेत. या दौऱ्याला शिवबंधन परिक्रमा असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.काल शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊ, वैभव नाईक, राजन विचारे यांच्या उपस्थितीत (Shiv Sena (UBT) Nashik rally)कोकणातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीतच कोकण दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला. दौर्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून १६ ते ३० जुलैदरम्यान माजी आमदार बाळ माने हे कोकण दौरा करून उद्धव ठाकरे यांच्या दौर्याचे नियोजन आणि तयारी करणार आहेत. कोकणातील स्थानिक नेतृत्वाशी समन्वय साधून सभा, बैठकांची आखणी केली जाणार आहे. शिवबंधन परिक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वीचा थेट जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भाजपा-शिंदे गटाविरुद्ध संघटनात्मक ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न केला जाणार आहे.