Underworld Don Arun Gawli Released After 18 Years in Jail
Gawli Walks Free After 18 Years – अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी (Arun Gawli) उर्फ डॅडीची (Daddy) तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर (Nagpur)मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केल्यानंतर आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात त्याला तुरुंगाबाहेर काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar Airport)आणून सोडले. त्यानंतर गवळी तेथून मुंबईकडे रवाना झाला.
२००७ मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर (Kamlakar Jamsandekar)यांच्या हत्येप्रकरणी (murder)२०१२ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यात हत्या, कट रचने आणि खंडणीसह मोक्का अंतर्गत गुन्हे सिद्ध झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले होते, की आरोपी गवळीने सुमारे १८ वर्षे तुरुंगात घालवल्याने जामीन मंजूर करण्यात येतो. आरोपीला ट्रायल कोर्टाने ठरवलेल्या अटींनुसार जामिनावर सोडावे. आरोपीने न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केले किंवा नव्याने गुन्ह्यात सहभागी असल्याचे आढळले तर संबंधित यंत्रणांना जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची मुभा आहे.
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये डॅडी नावाने कुख्यात अरुण गवळी भायखळ्याच्या चिंचपोकळीतील दगडी चाळीत वाढला. सुरुवातीला छोट्या गुन्ह्यांतून कारकीर्द सुरू करून त्यांनी स्वतःचा गँग सुरू केली. त्यानंतर दाऊद इब्राहिमविरोधी (anti-Dawood Ibrahim faction)गटाचे नेतृत्व हातात घेतले. गँगवॉरपुरतेच न थांबता त्याने पुढे स्वतःच्या अखिल भारतीय सेना (Akhil Bharatiya Sena) पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. मुंबईतील निवडणुकांमध्ये सहभाग घेऊन विधानसभा आमदारही झाले होते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मुंबईतील आंदोलन संपताच मराठ्यांवर नऊ गुन्हे दाखल
राज्यात पुढील ३ दिवस पावसाचे!अनंत चतुर्दशीलाही हजेरी लावणार
Zomato च्या ग्राहकांना मोठा झटका! जेवण मागवण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे