Home / News / Urdu Name Sparks Controversy : औरंगाबाद रेल्वे स्थानक आता छत्रपती संभाजीनगर! नाव उर्दूत लिहिल्याने वाद?

Urdu Name Sparks Controversy : औरंगाबाद रेल्वे स्थानक आता छत्रपती संभाजीनगर! नाव उर्दूत लिहिल्याने वाद?

Urdu Name Sparks Controversy – तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले होते. मात्र येथील रेल्वे स्थानकाचे...

By: Team Navakal
Urdu Name Sparks Controversy
Social + WhatsApp CTA

Urdu Name Sparks Controversy – तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले होते. मात्र येथील रेल्वे स्थानकाचे नाव पूर्वीप्रमाणे औरंगाबाद रेल्वे स्थानक असेच होते. आता या स्थानकाचे नाव अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.

नामांतरासंदर्भातील राजपत्रात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील नावांचा उल्लेख करण्यात आला होता, मात्र स्थानकावरील फलकांवर उर्दू भाषेतील नावाचाही समावेश झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत या स्थानकाचे नाव बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्वी औरंगाबाद स्टेशनचा कोड एडब्ल्यूबी असा होता, तर आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा नवा कोड सीपीएसएन असेल.


हे देखील वाचा –

मन की बातमध्ये मोदींनी गार्बेज कॅफेचे कौतुक केले

मोंथा चक्रीवादळाचा धोका ; आंध्र किनाऱ्यावर रेड अलर्ट

३० दिवसांत ग्रॅच्युइटी द्या ; अन्यथा आंदोलन करणार ! निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा

Web Title:
संबंधित बातम्या