Vagator and Assagao Club, Boutique Resort Sealed – आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव आढळून आल्याने सरकारच्या आदेशानुसार उत्तर गोव्यातील रोमिओ लेनचा वागातोर येथील क्लब आणि आसगावमधील ब्यूटीक रिसॉर्ट मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आले आहे. दरम्यान नाईट क्लबचा मालक थायलंडला फरार झाल्याची चर्चा आहे.
साकवाडी-हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये घडलेल्या जळीतकांडाच्या नंतर ही कारवाई केली आहे. या आस्थापनाच्या मालकीच्या वझरात-वागातोर येथील रोमिओ लेन क्लब तसेच आसगाव येथील रोमिओ लेन ब्यूटीक रिसॉर्टची पडताळणी सरकारी यंत्रणांनी केली.
त्यावेळी या ठिकाणी देखील सुरक्षेचे उपाय नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वागातोरमधील रोमिओ लेन क्लबला तर आसगावमधील रोमिओ लेन व्यूटीक रिसॉर्ट सील करण्यात आले. बार्देशचे मामलेदार अनंत मळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
हे देखील वाचा –
पान मसाल्यावर अधिभार विधेयकाला संसदेत मंजुरी
कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ डाॅ. बाबा आढाव यांचे 95 व्या वर्षी निधन









