Home / News / Walmik Karad’s Network Run by Police : वाल्मिक कराडची सगळी यंत्रणा एक पोलीस अधिकारी सांभाळतो ! बाळा बांगरांचा खळबळजनक दावा

Walmik Karad’s Network Run by Police : वाल्मिक कराडची सगळी यंत्रणा एक पोलीस अधिकारी सांभाळतो ! बाळा बांगरांचा खळबळजनक दावा

Walmik Karad’s Network Run by Police – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ हत्या नसून तो संस्थात्मक खून...

By: Team Navakal
walmik karad
Social + WhatsApp CTA


Walmik Karad’s Network Run by Police – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ हत्या नसून तो संस्थात्मक खून आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी,माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड याची संपूर्ण गुन्हेगारी यंत्रणा बीड पोलीसांच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षकच चालवत आहे, असा खळबजनक दावा सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी केला आहे.


सरपंच देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बांगर यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा दावा केला.


देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जरी तुरुंगात असले तरी त्यांना बाहेरून पद्धतशीर रसद पुरवली जात आहे. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) तत्कालीन पोलीस निरीक्षक ही जबाबदारी सांभाळत होते. त्याचे नाव मी लवकरच उघड करणार आहे. पोलीस दलातील काही लोक पोलीस अधीक्षकांनाही चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करतात. ज्यांनी रक्षण करायचे तेच जर भक्षकांना मदत करत असतील तर त्याला संस्थात्मक खूनच म्हणावे लागेल,असे बांगर म्हणाले.


हे देखील वाचा –

तिरूपती देवस्थानचा घोटाळा रेशीम ऐवजी पाॅलिएस्टर दुपट्टा

रोहित आर्या दहशतवादी नसताना त्याचे एन्काऊंटर का केले?

महाराष्ट्रातील भ्रष्टाचार उघड! व्हिडिओ, फोटो व्हायरल महेंद्र दळवी आणि नोटा! काम न करता मोबदला

Web Title:
संबंधित बातम्या