मुंबई- अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांबद्दल सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका २३ सप्टेंबरपासून मुंबईमध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत. तर २५ सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णयदेखील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. मानधन वाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
