गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत त्रुटी

अकोला – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आल्याने खळबळ उडाली.

अकोला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर फडणवीस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात जातील, असे सुरक्षा यंत्रणेला वाटले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे वाहन थेट मुख्य महामार्गावर लागले तरीही त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेचा ताफा मागेच राहिला. यात पोलिसांची वाहने आणि ॲम्बुलन्ससह इतर वाहनांचा समावेश होता. या प्रकारानंतर काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. याआधीही देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये अकोल्यात चूक झाली होती. आता पुन्हा अकोल्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेची चूक समोर आली आहे. दरम्यान, भाजपाचा मेळावा आटोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवनी विमानतळावरून नागपूरला प्रस्थान केले.